Roshan More
गजानन किर्तीकर यांनी आपला मुलगा अमोल किर्तीकर याला मदत केल्याचा आरोप करत शिंदे गटातून गजानन किर्तीक यांची शिवसेनेतून ( शिंदे गट) हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदे यांनी केली.
शिवसेनेतून शिशिर शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. 1992 मध्ये ते नगरसेवक झाले.
शिवसेनेकडून त्यांना उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करण्यासाठी त्यांनी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उडखली होती.
विधानपरिषदेचे सदस्य
1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते. शिवसेनेची साथ सोडत शिशिर शिंदे हे राज ठाकरेंसोबत गेले. 2006 मध्ये त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.
2018 मध्ये मनसेची साथ सोडून त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
2023 मध्ये शिशिर शिंदे यांनी मना सारखे काम मिळत नसल्याची खंत व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला, शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिशिर शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला.