Rashmi Mane
भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत 74 वर्षीय उद्योगपती सावित्री जिंदाल पहिल्या स्थानावर आहेत. सावित्री जिंदाल या जिंदाल ग्रुपच्या अध्यक्षा आहेत. फोर्ब्सच्या मते, सावित्री जिंदाल यांची एकूण संपत्ती $31.2 अब्ज आहे.
देशातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला विनोद राय गुप्ता आहेत, जी हॅवेल्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गुप्ता यांच्या आई आहेत. फोर्ब्सच्या मते, त्यांची संपत्ती 5.0 अब्ज आहे.
सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीतील पुढचे नाव Nykaa च्या कार्यकारी अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि CEO फाल्गुनी नायर यांचे आहे. 2.9 अब्ज संपत्तीसह, त्या देशातील आठव्या सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती आहे.
स्मिता कृष्णा यांच्याकडे गोदरेज ग्रुपची 20 टक्के हिस्सेदारी आहे. त्यामुळे त्या देखील श्रीमंत महिलांच्या यादीत येतात.
राकेश झुनझुनवाला यांची पत्नी श्रीमंत महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 8.5 अब्ज डॉलर्स आहे.
भारतातील टॉप श्रीमंत महिलांमध्ये किरण मुझुमदार शॉ यांचेही नाव आहे. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती २.७ अब्ज डॉलर आहे.
मृदुला पारेख यांचाही देशातील श्रीमंत महिलांच्या यादीत नाव आहे. तिला त्यांचे दिवंगत पती सुशील कुमार पारेख यांच्या पिटिलाइट इंडस्ट्रीजमध्ये वारसाहक्काने हिस्सा मिळाला आहे.