Suryakanta Patil : भाजपची साथ सोडून तुतारी हाती घेणाऱ्या सूर्यकांता पाटील यांचा राजकीय प्रवास कसा?

Jagdish Patil

महत्वाचा राजकीय निर्णय

शरद पवार म्हणाले, पाटील यांची विचारधारा गांधी नेहरु यांची आहे. त्यांनी योग्य वेळी महत्वाचा राजकीय निर्णय घेतला.

Suryakanta Patil | Sarkarnama

1980 मध्ये आमदार

त्या 1980 मध्ये हदगाव मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार. 1986 मध्ये काँग्रेसकडून राज्यसभेवर. तर 1991, 1998 आणि 2004 असे तीन वेळा त्या लोकसभेवर निवडून गेल्या.

Suryakanta Patil | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी

2014 मध्ये अचानक सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

Suryakanta Patil | Sarkarnama

नवी विचारधारा

ज्या पक्षाच्या विरोधात सर्वाधिक काळ राजकारण केले त्याच पक्षात पाटील गेल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र विचारधारा आणि नवीन लोकांमध्ये त्या जास्त रमल्या नाहीत.

Suryakanta Patil | Sarkarnama

राजकारणातून संन्यास

मे 2020 मध्ये त्यांनी थेट राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा केली. 43 वर्ष राजकारणात सक्रीय असलेल्या पाटील यांनी नव्या लोकांमध्ये मन रमत नसल्याचं सांगत संन्यासाची घोषणा केली.

Suryakanta Patil | Sarkarnama

केसाने गळा कापला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडतांना त्यांनी शरद पवारांनी आपला केसाने गळा कापल्याचा आरोप केला होता. मात्र आता पुन्हा त्याच पवारांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांनी नव्या राजकारणाची तुतारी फुंकली आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

अंतापर्यंत तुमच्यासोबत

भविष्यातील लढाईसाठी मी तुमच्यासोबत आले आहे. या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे. परतीचे दोर मी स्वत: कापले असून मी माझ्या अंतापर्यंत आपल्यासोबत असेन, असा शब्द पाटील यांनी पवारांना दिला.

Suryakanta Patil | Sarkarnama

मंत्रालय राज्यमंत्री

एकंदरीत पाटील यांनी 4 वेळा खासदार, एक वेळा आमदार म्हणून हिंगोली-नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्या ग्रामविकास मंत्रालय राज्यमंत्री व संसदीय कार्य मंत्रालय राज्यमंत्री होत्या.

Suryakanta Patil | Sarkarnama

NEXT : सफाई कंत्राटदाराची मुलगी आधी बनली पशुवैद्यकीय डॉक्टर नंतर UPSC उत्तीर्ण

Taruna Kamal UPSC | Sarkarnama