Taruna Kamal UPSC : सफाई कंत्राटदाराची मुलगी आधी बनली पशुवैद्यकीय डॉक्टर नंतर UPSC उत्तीर्ण

Rashmi Mane

तरुणा कमल

हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणा कमल हिने इतिहास रचला आहे. प्रचंड मेहनत करत तरूणा यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

Taruna Kamal UPSC | Sarkarnama

पहिल्याच प्रयत्नात यश

मंडी जिल्ह्यातील बलह खोऱ्यातील रत्ती गावात राहणाऱ्या तरुणा कमलचे यश विशेष आहे, कारण पहिल्याच प्रयत्नात हे स्थान मिळवले आहे.

Taruna Kamal UPSC | Sarkarnama

यूपीएससी प्रवास सोपा नव्हता

तरूणा यांचा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

Taruna Kamal UPSC | Sarkarnama

वडील सफाई कंत्राटदार

तरूणांचे वडील बल्ह नगरपरिषदेत सफाई कंत्राटदार म्हणून काम करतात.

Taruna Kamal UPSC | Sarkarnama

अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास

अतिशय हालाखीच्या परिस्थितीत तरूणा यांनी डॉक्टर आणि नंतर अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

Taruna Kamal UPSC | Sarkarnama

शिक्षणासाठी चंदीगडला

तरूणा यांच्यासाठी घरापासून दूर राहून यूपीएससीची तयारी करणे सोपे नव्हते. मात्र तरी सुद्धा बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी चंदीगडला गेल्या.

Taruna Kamal UPSC | Sarkarnama

पशुवैद्यकीय डॉक्टर

येथे त्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर होण्यासाठी अभ्यास सुरू केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर तरुणाच्या कुटुंबाला वाटले की आता आपल्या मुलीचे करिअर पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून होईल. पण, तरुणा इथेच थांबणार नव्हत्या.

Taruna Kamal UPSC | Sarkarnama

यूपीएससीची तयारी

पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तरुणाने यूपीएससीची तयारी सुरू केली आणि त्या पहिल्याच प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

Taruna Kamal UPSC | Sarkarnama

Next : प्रमोद महाजनांनी म्हटलं, वर्गणी गोळा कर, भीक माग पण...; गिरीश महाजनांनी सांगितला निवडणुकीचा 'तो' किस्सा