Roshan More
निवडणूक आयोगाने मोठी कारवाई करत तब्बल 334 पक्षांची मान्यता रद्द केली.
निवडणूक आयोगाने मान्यता रद्द केलेल्या पक्षांमध्ये महाराष्ट्रातील 9 पक्षांचा समावेश आहे.
मान्यता रद्द झालेल्या पक्षांमध्ये महाराष्ट्रातील आवामी विकास लीग, इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया, नवभारत डेमोक्रेटिक पार्टी, बहुजन रयत पार्टी, भारतीय संग्राम परिषद, पीपल्स गार्डियन या पक्षांचा समावेश आहे.
मान्यता रद्द झालेले सर्वाधिक पक्ष उत्तर प्रदेशमधील आहेत. त्यांची संख्या 114 आहे.
देशभरात केवळ सहा राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यामध्ये काँग्रेस, भाजप, बसपा, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), नॅशनल पीपल्स पार्टी आणि आप यांचा समावेश होतो.
देशभरता आता 67 प्रादेशिक पक्ष राहिलेले आहेत.
आयोगाच्या कारवाईपूर्वी एकुण 2 हजार 854 नोंदणीकृत पक्ष देशात होते. मात्र आता त्यांची संख्या 2 हजार 520 येवढी झाली आहे.