Roshan More
दरवर्षी भारतीय संसदेची अधिवेशन होतात. मात्र, या अधिवेशनांची नेमकी संख्या किती आणि त्यामध्ये नेमका काय फरक असतो हे समजून घेऊयात.
भारतीय संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश आहे. ही देशाची सर्वोच्च विधिमंडळ आहे.
संसद अधिवेशन म्हणजे तो कालावधी, जेव्हा लोकसभा आणि राज्यसभा नियमितपणे बसून विधिमंडळी कामकाज, अर्थसंकल्प आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतात.
साधारणपणे संसदेत तीन नियमित अधिवेशने होतात. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन होतात. तसेच विशेष प्रसंगी विशेष अधिवेशनही बोलावले जाते.
फेब्रुवारी ते मेपर्यंत चालते. हे सर्वात मोठे अधिवेशन असते. यात आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. हे दोन टप्प्यांत पार पडते.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत चालते. यात जनहिताचे मुद्दे, विधेयके आणि धोरणात्मक चर्चांना महत्त्व दिले जाते.
राष्ट्रपती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून बोलावता. जसे की राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दे किंवा महत्त्वाची विधेयकांसाठी हे बोलावले जाते.