सरकारनामा ब्यूरो
भारतातील सर्वसामान्य लोक सर्वात जास्त ट्रेनने प्रवास करतात, त्याचे कारण म्हणजे लांबचा प्रवास ट्रेनमुळे सुखकर आणि कमी पैशांमध्ये होतो.
भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळे असून, देशात रोज हजारो गाड्या रुळावर धावतात. जाणून घेऊयात देशात किती प्रकारच्या रेल्वे गाड्या धावतात.
भारतात पॅसेंजर ट्रेन, एक्सप्रेस ट्रेन, मेल-एक्सप्रेस ट्रेन, सुपरफास्ट आणि वंदे भारत एक्सप्रेस अशा अनेक रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
भारतीय रेल्वेची स्थापना 16 एप्रिल 1853 झाली. पॅसेंजर रेल्वे प्रामुख्याने कमीत-कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यासाठी आहे. आणि ही रेल्वे मार्गातील प्रत्येक स्टेशनवर थांबते.
ही ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी असून काही प्रमुख थांब्यांवरच थांबते. या गाड्यांचा तिकीट दरही पॅसेंजर गाड्यांच्या तुलनेत अधिक असतो. तसेच अधिक सुविधाही असतात.
मेल-एक्सप्रेस गाड्यांचा ताशी वेग 50 किलोमीटर असतो. या गाड्या एक्स्प्रेस गाड्यांसारख्या लांब प्रवासासाठी आहेत.
या गाड्याचा वेग एक्सप्रेस गाड्यांपेक्षा फास्ट असून सुपरफास्ट रेल्वे जास्त अंतराचा प्रवास वेगाने करण्यासाठी वापरतात. यामध्ये वंदे भारत, राजधानीचाही समावेश आहे.
भारतातील अनेक शहरांमध्ये आता मेट्रो धावत आहे. शहरांतर्गत प्रवासासाठी अत्यंत आरामदायी आणि जलद वाहतूक सेवा म्हणून मेट्रोकडे पाहिले जाते.