सरकारनामा ब्यूरो
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांचे बुधवारी (ता.19) पहाटे पृथ्वीवर आगमन झाले आहे.
अंतराळात नऊ महिने घालवल्यानंतर,त्या अखेर पृथ्वीवर सुरक्षित परतल्यामुळे संपूर्ण देशात कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात, सुनिता विल्यम्स यांच्यासारखे अंतराळवीर बनण्यासाठी काय करावे लागते.
त्यांनी अंतराळात असताना स्टारलायनरच्या पायलट म्हणून काम केले आहे. तसेच नासाच्या अनेक महत्वाच्या प्रकल्पावर काम केले.
नासामध्ये अंतराळवीर होण्यासाठी सर्वसामान्य नागरिक अर्ज करू शकतात, मात्र यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे पाहू...
सर्वप्रथम अर्जदार हा अमेरिकेचा नागरिक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराने विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रातील पदव्युत्तर किंवा बायोलॉजिकल सायन्स, फिजिकल सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्स यापैकी कोणतीही पदवी प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
पदवी प्राप्तीनंतर काही दिवस कामाचा अनुभव आणि जेट विमानाचा पायलट-इन-कमांड म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभवात किमान 1 हजार तास विमान चालवले असले पाहिजे.
अंतराळ उड्डाणाच्यावेळी शारीरिक चाचणी पास करणे, यावेळी दृष्टी, रक्तदाब आणि उंची यांची तपासणी केली जाते. यामध्ये अर्जदाराची उंची 62 ते 75 इंच असणे आवश्यक.
अंतराळवीरांच्या निवडीच्या अर्जदाराची शैक्षणिक पात्रता व इतर माहितीची पडताळणी 'ॲस्ट्रोनॉट सिलेक्शन बोर्ड' ही अंतराळवीर निवड मंडळ करते.