Amit Ujagare
महाराष्ट्र विधान परिषदेतील पदवीधऱ व शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये सत्ताधारी महायुतीसाठी निराशाजनक कामगिरी ठरली.
तर महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक नवसंजीवनी देणारी ठरली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला २, काँग्रेसला १ अशा तीन जागा मविआला मिळाल्या, तर भाजपला १, शिवसेनेला १ अशा दोन जागा महायुतीला मिळाल्या.
या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान पार पडलं तर मतमोजणी २७-२९ ऑक्टोबर अशी तीन दिवस चालली. या निवडणुकीत विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार यांना किती मतं मिळाली, याची माहिती निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे.
कौस्तुभ गावडे, भाजप (विजयी, २३,११७ प्राप्त मतं), सचिन सानप, अपक्ष (दुसरा क्रमांक, १६,३४७ प्राप्त मतं)
किरण सरनाईक, शिवसेना (विजयी, १६,६६३ प्राप्त मतं), अदिती पोहरे, काँग्रेस (दुसरा क्रमांक, ८,६३६ प्राप्त मतं)
हर्षदा देशमुख-जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (विजयी, १,१३,८४० प्राप्त मतं), डॉ. स्मिता योगेश जाधव, भाजप (दुसरा क्रमांक, १,०३,९१२ प्राप्त मतं)
अभिजीत वंजारी, काँग्रेस (विजयी, ६७,२३१ प्राप्त मतं), सुधाकर कोहळे, भाजप (दुसरा क्रमांक, ६३,९६०)
डॉ. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (विजयी, ८५,८७६ प्राप्त मतं), सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (दुसरा क्रमांक, ६७,७५२ प्राप्त मतं)