Rashmi Mane
राज्यात आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोलिस आणि प्रशासनाच्या पथकांनी जागो जागी चेकींग करायला सुरुवात केली आहे.
आचारसंहितेमध्ये अनेक गोष्टींवर बंधने आहेत. ज्यामध्ये रोख रकमेपासून दागिने सोबत बाळगण्यावर मर्यादा घालण्यात आली आहे.
मतदारांना आमिष दाखविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने रोख रक्कम घेऊन जाण्याची मर्यादा निश्चित केली आहे.
तुमच्याकडे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रोकड असल्यास तुम्ही तुरुंगातही जाऊ शकता. निवडणूक आचारसंहितेनुसार किती रोख रक्कम आणि किती दागिने सोबत ठेवता येतील ते पाहूया...
निवडणूक आयोगाने रोख रक्कम घेऊन जाण्याची मर्यादाही निश्चित केली आहे. कागदपत्रांशिवाय 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख बाळगणारे अडचणीत येऊ शकतात.
कोणतीही व्यक्ती कागदपत्रांशिवाय 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम घेऊन जाऊ शकत नाही. 50 हजारांपेक्षा जास्त रकम तुमच्यासोबत असल्यास त्या संबंधित कागदपत्रे दाखवणे बंधनकारक आहे. जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील तर ती रोकड जप्त केली जाते.
एटीएममधून पैसे काढल्यानंतर स्लिप आणि मोबाईलवर आलेला मेसेज सेव्ह करा.
बँकेतून पैसे काढताना पैसे काढण्याची छायाप्रत आणि पास बुक सोबत ठेवा.
जर रक्कम कोणत्याही फर्म किंवा व्यावसायिकाशी कोणत्याही व्यवहाराशी संबंधित असेल तर पावती किंवा बिल ठेवा.
रक्कम मोठी असल्यास ती कुठून घेतली जात आहे हे दर्शविणारा फॉर्म असावा.