Jagdish Patil
राज ठाकरेंच्या हस्ते 'मनसे'चा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
या जाहीरनाम्यात मूलभूत गरजांपासून मराठी अस्मिता अशा विविध मुद्यांचा समावेश आहे.
'आम्ही हे करू' या 'टॅगलाईन'ने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
मूलभूत गरजा, दर्जेदार जीवनमान, पुरेसं अन्न, पिण्याचं पाणी कायदा, सुव्यवस्था, आणि महिला सुरक्षा यांसारख्या मुद्द्यांचा समावेश.
तसंच दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, राज्यभर शहरांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण या मुद्द्यांना हात घातला आहे.
तर राज्याचं औद्योगिक धोरण, व्यापाराचं धोरण, प्रशासन आणि उद्योग नियंत्रण, शेती, पर्यटन आणि व्यावसायिक शिक्षणावरही भर देण्यात आला आहे.
जाहीरनाम्यात मनसेचा अजेंडा त्यांनी कायम ठेवला आहे. मराठी अस्मिता, मराठी भाषेचा प्रचार, दैनंदिन वापरात मराठी यासह गड किल्ले संवर्धनावर त्यांनी जोर दिला आहे.