सरकारनामा ब्यूरो
राष्ट्रपती भवन हे देशाच्या राष्ट्रपतींचे निवासस्थान आहे. राष्ट्रपती भवन बांधले होते त्यासाठी किती खर्च करण्यात आला होता, तुम्हांला माहितीय...
दिल्लीतील राष्ट्रपती भवन हे रायसीना हिलवर असून यांची स्थापना 1912 ते 1929 या दरम्यान करण्यात आली आहे.
ब्रिटिश वास्तुकलाकार सर एडविन लुटियन्स यांनी राष्ट्रपती भवनाची रचना केली. हे भवन जवळ जवळ 320 एकर मध्ये तयार करण्यात आले आहे.
भवनाला 1931 ते 1947 या कालवधीत व्हाईसरॉय हाऊस या नावाने ओळखले जात होते. मात्र, 1950 ला भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर भवनाची ओळख सरकारी निवासस्थान म्हणून करण्यात आली .
राष्ट्रपती भवनात एकूण 340 खोल्या आहेत. संपूर्ण भवन पाहण्यासाठी तीन तासांचा अवधी लागतो. या भवनात रिसेप्शन हॉल, सरकारी अतिथींसाठीच्या खोल्या, कार्यालये,आणि संग्रहालय आहे.
राष्ट्रपती भवन बांधण्यासाठी तब्बल 1.44 कोटी इतका खर्च करण्यात आला आहे.
चार मजली राष्ट्रपती भवनात कॉरिडॉर, कोर्ट, गॅलरी, सलून, पॅन्ट्री आणि इमारतीमध्ये प्रिंटिंग प्रेस, थिएटरही तयार करण्यात आले आहे.
चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी भारतीय गव्हर्नर जनरल पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर राष्ट्रपती भवनात राहायला गेले होते.