सरकारनामा ब्यूरो
प्रयागराज येथे 13 तारखेपासून सुरु होणाऱ्या महाकुंभामेळ्यासाठी लाखो भक्त, संत, सेलिब्रिटी येत आहेत.
या कुंभमेळाव्यामध्ये एक नाव खुप चर्चेत आहे. ते म्हणजे ॲपलचे दिवंगत सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स यांचं.
लॉरेन जॉब्स या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळाव्यासाठी 13 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत म्हणजेच17 दिवस भारतात राहणार आहेत.
पण तुम्हाला माहित आहे का जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत पाचव्या स्थानावर असणाऱ्या लॉरेन जॉब्स यांची एकूण संपत्ती किती आहे?
ॲपलचे दिवंगत सह-संस्थापकाच्या पत्नी लॉरेन पॉवेल आणि स्टीव्ह जॉब्स यांची पहिली भेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली होती. दोन वर्षांनंतर या जोडप्याने 1991ला लग्न केले.
2011ला स्टीव्ह जॉब्स यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती लॉरेन यांच्या नावे करण्यात आली.
61 वर्षीय लॉरेन यांची एकूण संपत्ती 15.5अब्ज डॉलर्स तर अॅपलच्या कंपनीत 55 लाख शेअर्स आणि वॉल्ट डिस्ने कंपनील 7.3 टक्के इतके शेअर्स आहेत.
जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत नाव असणाऱ्या लॉरेन या अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकावर आणि जगातील श्रीमंत महिलांच्या यादीत पाचव्या क्रमांकाच्या त्यांचं नाव आहे.
त्यांची हिंदू आणि बौद्ध धर्मावर प्रचंड श्रद्धा असल्याने लॉरेन या महाकुंभामेळ्यात उपस्थित राहणार आहेत.