Roshan More
दिवाळीनंतर निवडणुकीचा बार उडणार नाही. जिल्हा परिषद तसेच महापालिका, पंचायत समितीच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत पार पडतील.
जिल्हा परिषद गट आणि महापालिका प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत.
विधानसभेत उमेदवारांना खर्चाची मर्यादा 40 लाखापर्यंत असते. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत ती किती असते या विषयी जाणून घेऊयात
महापालिकेत किती वाॅर्ड आहेत. त्या महापालिकेच्या सदस्यसंख्येनुसार खर्चाच्या मर्यादेत बदल होतो.
१५१ ते १७५ प्रभाग असलेल्या महापालिकेत उमेदवार १० लाखापर्यंत खर्च करू शकतो.
११६ ते १५० प्रभाग असलेल्या पालिकेत ८ लाख तसेच ८६ ते ११५ प्रभागामध्ये ७ लाख आणि ६५ ते ८५ प्रभागसंख्या असलेल्या पालिकांमध्ये उमेदवार ५ लाखांपर्यंत खर्च करू शकतो.
७१ ते ७५ गट असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये ६ लाख, ६१ ते ७० गट असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये उमेदवार ५ लाखापर्यंत खर्च करू शकतो.
आठ वर्षांपूर्वी निवडणुकी आयोगाने ही खर्चाची मर्यादा जाहीर केली होती. मात्र, महागाईचा वाढता निर्देशांक पाहता या खर्चामध्ये यंदा वाढ घोषित करण्याची शक्यता आहे.