सरकारनामा ब्यूरो
इंग्रज भारतात येण्यापूर्वी भारताची ओळख 'सोनेकी चिडिया' अशी केली जात होती.
इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. 1765 ते 1900 याचं काळात इंग्रजांनी भारतातील संपत्तीची प्रचंड लूट केली. यावरील एक अहवाल समोर आला असून. त्यावेळी इंग्रजांनी भारतातील किती संपत्ती लुटली जाणून घेऊयात.
ऑक्सफॅम या संस्थेने हा नवीन अहवाल सादर केला आहे. दरवर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या एक दिवसाआधी हा अहवाल सादर केला जातो.
यात इंग्रजांनी भारतातून तब्बल 64.82 खर्व डॉलर म्हणजे 64 हजार कोटी रूपये एवढी अफाट संपत्तीची लूट केल्याचं समोर आले आहे.
या अहवालात केलेल्या अभ्यासाकांनी संदर्भ दिला आहे. यामध्ये भारतातून लुटलेला पैशांपैकी 33.8 खर्व डॉलर इतका पैसा इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत लोकांकडे गेला असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
आंतरराष्ट्रीय औद्योगिक उत्पादनात 1750 ला भारताचे योगदान जवळपास 25 टक्के होते. मात्र 1900 पर्यंत हा आकडा वेगाने कमी होऊन 2 टक्क्यांवर आल्याचे यात नमूद केले आहे. याचं कारण भारतातील वस्त्र उद्योगाविरोधातील ब्रिटनची संरक्षणवादी धोरणे असल्याचं सांगितलं जात.
1875 ला भारतात सर्वाधिक पैसे कमवणारे लोक सैन्य दलात होते. परंतु 1940 पर्यंत अनेक व्यापारीवर्ग, उद्योपती असे वर्ग निर्माण झाल्याने सगळे पैसे तिकडे गेल्याचा दावा या अहवालात केला आहे.
तर 2015 च्या परकीय चलनानुसार 1757 ते 1947 या काळात ब्रिटीशांमुळे भारताचे 30 ट्रिलियन डॉलर्स इतकं आर्थिक नुकसान झालं, असे यात सांगितले आहे.