सरकारनामा ब्युरो
अभिनेत्री रन्या राव हिला काही दिवसांपूर्वी सोने तस्करीत अटक करण्यात आली आहे.
आता या प्रकरणात चौकशीतून विविध गोष्टी पुढे येत आहेत.
या प्रकरणी महसूल खात्याचे गुप्तहेर (डीआरआय) अधिकारी तरुण राज याची चौकशी करत आहेत.
रन्या रावचा मित्र तरुण राज हा तिला दुबईत सोने कसे मिळवायचे आणि तेथून ते कसे आणायचे, याची ब्लूप्रिंट पाठवत होता.
दुबईच्या प्रवासादरम्यान तो तिच्या मैत्रिणीच्या संपर्कात होता व सूचना देत होता.
रन्याने तिच्या मित्राच्या सूचनांचे पालन केले. तरुणची रण्याशी मैत्री होती.
त्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून त्याचे दुबईतील काही व्यापाऱ्यांशी संबंध होते.
तरुणने तस्करीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असावी. कारण त्यातून पैसे कमावणे आणि काळा पैसा पांढरा करणे सोपे होते, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
IAS पदासाठी पोस्ट हातात तरीही गावच्या मातीशी कनेक्ट ठेवणारी महिला अधिकारी