Jagdish Patil
IAS असूनही मातीशी आणि संस्कृतीशी असलेली नाळ न तोडणाऱ्या अधिकारी अशी मोनिका यादव यांची ओळख आहे.
मोनिका यादव यांनी केलेल्या पारंपारिक पोशाखामुळे त्या सोशल मीडियावर लोकप्रिय झाल्या आहेत.
राजस्थानमधील लिसाडिया गावच्या मोनिका 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करत 403 वा रँकने IAS बनल्या.
लहानपणापासूनच त्या अभ्यासात हुशार होत्या. यापूर्वीही राजस्थान प्रशासकीय सेवा (RAS) परीक्षेत त्यांनी 93 वा क्रमांक पटकावला आहे.
JRF, CA अशा कठीण परीक्षांमध्येही त्या यशस्वी झाल्या आहेत. तर त्यांचे वडील हरफूल सिंह यादव हे वरिष्ठ RAS अधिकारी आहेत.
IAS सारख्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही त्यांनी आपल्या गावची परंपरा आणि साधेपणा सोडला नाही.
त्या पारंपारिक पोशाखात वावरतात त्यामुळे स्थानिकांना प्रेरणा मिळते. IAS असलेल्या मोनिका तरुणांना कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचार करण्याचा सल्ला देतात.