Indian Army Bhairav Battalion : सीमेच्या पलीकडे शत्रूवर घातक वार, ऑपरेशन्स ऐकून उडेल थरकाप! भैरव बटालियन’ची खासियत काय?

Rashmi Mane

सक्षम भारतीय सेना

भारतीय सेना आता नव्या तंत्रज्ञानासोबत स्वतःला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवत आहे.

‘भैरव बटालियन’

आधुनिक युद्ध पद्धतींमध्ये बदल होत असताना, पारंपरिक लढाया आता पुरेशा ठरत नाहीत. या नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय सेना २५ नव्या ‘भैरव बटालियन’ (Bhairav Battalions) उभारत आहे.

बटालियन

या बटालियन पायदळाला अधिक वेगवान, प्राणघातक आणि तांत्रिक बनवतील. लेफ्टनंट जनरल अजय कुमार, इन्फॅन्ट्रीचे डायरेक्टर जनरल, यांनी सांगितले की प्रत्येक पायदळ बटालियनमध्ये ‘अश्नी प्लाटून’ तयार केल्या जात आहेत.

जबाबदारी

आतापर्यंत अशा 382 प्लाटून तयार झाल्या असून त्या ड्रोनच्या साहाय्याने गुप्तचर, नजर आणि हल्ल्यांची जबाबदारी पार पाडतील.

प्रशिक्षित आणि धाडसी

भैरव बटालियनची खासियत म्हणजे तिची रचना आणि गतिशीलता. प्रत्येक बटालियनमध्ये फक्त २५० निवडक सैनिक असतील, जे अत्यंत प्रशिक्षित आणि धाडसी असतील.

अचूक हल्ला

या बटालियन lean, lethal आणि highly mobile असतील. म्हणजेच त्या तणावाच्या परिस्थितीत जलद प्रतिसाद देऊ शकतील आणि शत्रूच्या हद्दीत घुसखोरी करून महत्त्वाच्या ठिकाणांवर अचूक हल्ला करतील.

मोर्चेबांधणी

सध्या अशा ५ बटालियन तैनात करण्यात आल्या आहेत. दिमापूर, जोधपूर, लेह, श्रीनगर आणि नागरोटा येथे. या सर्व ठिकाणी भारताच्या सीमेवरील संवेदनशील भागांमध्ये मोर्चेबांधणी करण्यात आली आहे.

तंत्रज्ञानाचा संगम

भैरव बटालियन आणि अश्नी प्लाटूनच्या माध्यमातून भारतीय सेना पारंपरिक ताकद आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधत आहे. या नव्या संरचना केवळ युद्धकौशल्य वाढवणार नाहीत, तर देशाच्या सीमांची सुरक्षा अधिक सक्षम करतील.

Next : जपानची सत्ता पहिल्यांदाच धडाकेबाज महिलेच्या हाती; कोण आहेत साने ताकाइची?

येथे क्लिक करा