Blue Aadhaar Card : पालकांनो, मुलांचे 'ब्लू आधार कार्ड' काढणे झाले सोपे; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस!

Rashmi Mane

काय आहे निळे आधार कार्ड?

लहान मुलांसाठी बनवलेले ब्लू आधार कार्ड काय आहे, जाणून घ्या घरबसल्या सोप्या भाषेत.

Blue Aadhaar Card for children | Sarkarnama

आधार कार्डचे महत्त्व

आजच्या घडीला प्रत्येकासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे ओळखपत्र आहे. बँक खाते, शासकीय योजना, मोबाईल सिम, एलपीजी सिलिंडर – सर्वत्र आधार आवश्यक!

Blue Aadhaar Card for children | Sarkarnama

ब्लू आधार म्हणजे काय?

2018 मध्ये UIDAI ने सुरू केलेली ही खास सुविधा आहे. 5 वर्षे वयाखालील मुलांसाठी बनवले जाणारे आधार कार्ड निळ्या रंगात असल्यामुळे त्याला ब्लू आधार किंवा बाल आधार म्हणतात.

Blue Aadhaar Card for children | Sarkarnama

कोणासाठी बनते ब्लू आधार?

5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी, मुलांना स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी ब्लू आधार बनते.

Blue Aadhaar Card for children | Sarkarnama

ब्लू आधारची वैशिष्ट्ये

ब्लू आधारची वैशिष्ट्ये म्हणजे मुलांचे बायोमेट्रिक प्रिंट घेतले जात नाहीत. मुलाची माहिती पालकांच्या आधारशी लिंक होते. कार्डवर मुलाचे छायाचित्र असते.

Blue Aadhaar Card for children | Sarkarnama

अपडेट कधी करावे?

मुलाचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यावर आणि 15 वर्षे झाल्यावर बायोमेट्रिक्स (फोटो, फिंगरप्रिंट, आयरिस) अपडेट करणे आवश्यक आहे.

Blue Aadhaar Card for children | Sarkarnama

ब्लू आधारसाठी आवश्यक कागदपत्रे

पालकांचे आधार कार्ड
मुलाचा जन्म दाखला
मोबाईल नंबर

Blue Aadhaar Card for children | Sarkarnama

ब्लू आधारसाठी अर्ज कसा करावा?

UIDAI च्या वेबसाइटवर जा (uidai.gov.in)

नावनोंदणीसाठी अपॉइंटमेंट घ्या

जवळच्या एनरोलमेंट सेंटरवर भेट द्या.

आवश्यक कागदपत्रे द्या आणि पावती क्रमांक घ्या.

Blue Aadhaar Card for children | Sarkarnama

Next : पीएम मोदींचा जपान दौरा: बुलेट ट्रेन सफर आणि सेमीकंडक्टर प्लांट भेट

येथे क्लिक करा