Rashmi Mane
भारतीय रेल्वे प्रवाशांची सुविधा व सुरक्षेसाठी TTE अर्थात ट्रॅव्हल टिकट एग्जामिनरची नेमणूक केली जाते. चला जाणून घेऊया, TTE कसं बनायचा?
TTE चे मुख्य काम प्रवाशांची ओळख तपासणे, तिकीट व सीटशी संबंधित माहिती पडताळणे आणि नियमांचे पालन करून प्रवास सुरळीत ठेवणे हे असते.
TTE होण्यासाठी उमेदवाराने किमान 50% गुणांसह 12वी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
12वी नंतर उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून डिप्लोमा कोर्स केलेला असणे गरजेचे आहे.
उमेदवार भारतीय नागरिक असावा आणि तो कोणत्याही राज्यातून TTE पदासाठी अर्ज करू शकतो.
रेल्वेतील TTE भरती प्रक्रिया RRB (Railway Recruitment Board) मार्फत केली जाते.
RRB च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतो.