PF withdrawal : मुलीच्या लग्नासाठी पैशांची चिंता नको; PF मधून काढता येणार एवढे पैसे!

Rashmi Mane

मुलीच्या लग्नासाठी पैशांची चिंता नको!

EPFO च्या नियमांनुसार कर्मचारी भविष्य निधी (PF) खात्यातून आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

PF withdrawal for daughter's marriage | Sarkarnama

कोण करू शकतो अर्ज?

कर्मचाऱ्याने किमान 7 वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी. तेव्हाच तो या सुविधेसाठी पात्र ठरतो.

PF withdrawal for daughter's marriage | Sarkarnama

किती पैसे काढता येतात?

आपल्या PF खात्यातील 50% रक्कम (बैलन्सच्या) पर्यंतची रक्कम काढता येते.
ही रक्कम फक्त लग्नाच्या उद्देशाने वापरता येते.

किती वेळा मिळते ही सुविधा?

एक कर्मचारी आपल्या कारकिर्दीत जास्तीत जास्त 3 वेळा ही सुविधा घेऊ शकतो.

PF withdrawal for daughter's marriage | Sarkarnama

अर्ज कसा करावा?

निकासीसाठी EPFO पोर्टल किंवा UMANG अ‍ॅप चा वापर करून अर्ज करता येतो. ही
प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.

PF withdrawal for daughter's marriage | Sarkarnama

कोणता फॉर्म लागतो?

फॉर्म-31 वापरून अर्ज करावा लागतो. हा फॉर्म EPFO पोर्टलवर उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड

  • बँक खाते माहिती

  • हे दोन्ही UAN क्रमांकासोबत लिंक असणे आवश्यक आहे.

PF withdrawal for daughter's marriage | Sarkarnama

ही रक्कम परत करावी लागते?

ही एक (Non-Refundable Advance) रक्कम आहे. म्हणजेच परतफेड करण्याची गरज नाही.

PF withdrawal for daughter's marriage | Sarkarnama

Next : 8व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर किती असेल IAS अधिकाऱ्यांचा पगार? 

येथे क्लिक करा