सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका IAS अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलाच्या रिसेप्शन कार्यक्रमात अनेक सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांची झुंबड पाहायला मिळाली. कोण आहेत हे IAS जाणून घेऊयात...
नवनीत सहगल यांच्या मुलाचा रिसेप्शन कार्यक्रम होता. यावेळी मायावती, अखिलेश यादव आणि राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
प्रत्येक सरकारमध्ये एक प्रभावी अधिकारी असतो आणि तेच आहेत IAS नवनीत सहगल. मायावती, अखिलेश यादव आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.
नवनीत सहगल हे 1988 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.
मुळचे पंजाब येथील फरीदकोटचे रहिवासी असलेले नवनीत सहगल यांनी हरियाणा राज्यातील अंबाला जिल्ह्यातून त्यांच्या शिक्षणाला सुरुवात केली.
त्यांना सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करायचा होता, मात्र त्यांचे वय कमी असल्याने CA साठी प्रवेश घेतला. CA केल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली.
नवनीत यांनी 1988 ला UPSC परीक्षा दिली आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांना पहिल्यांदा प्रशिक्षणासाठी सहारनपूर येथे तैनात करण्यात आले होते.
अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या 2022ला सपा-बसपा युती सरकारमध्ये मायावतींनी त्यांना लखनऊचे डीएम बनवले. यानंतर अनेक सरकारबरोबर त्यांनी काम केले.
नवनीत सहगल निवृत्तीनंतरही त्यांच्या कामामुळे ओळखले जातात. यामुळे मुख्यमंत्री योगींपासून ते अखिलेशपर्यंत सर्वजण त्यांच्या मुलाच्या स्वागत समारंभात आशीर्वाद देण्यासाठी आले होते.