आधार कार्डमध्ये मोबाइल नंबर बदलायचा आहे? जाणून घ्या योग्य प्रक्रिया 5 स्टेप्समध्ये

Rashmi Mane

मोबाइल नंबर बदलायचा आहे?

आधार कार्डला जुना मोबाइल नंबर लिंक असेल, तर तो बदलणे आता सोपे आहे. नवीन नंबर अपडेट करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करता येत नाही.

Aadhar Card Update | Sarkarnama

स्टेप 1 – UIDAI

सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा. तेथे तुमच्या जवळचे आधार सेवा केंद्र किंवा नोंदणी केंद्र शोधा.

Aadhar Card Update | Sarkarnama

स्टेप 2 – केंद्राला भेट द्या

जवळच्या आधार केंद्रावर प्रत्यक्ष जा. सोबत आधार कार्ड किंवा आधार क्रमांक ठेवा. मोबाइल नंबर बदलण्यासाठी स्वतः उपस्थित राहणे गरजेचे आहे.

Aadhar Card New Update | Sarkarnama

स्टेप 3 – अपडेट फॉर्म भरा

केंद्रावर आधार अपडेट फॉर्म मागून घ्या. त्यामध्ये नवीन मोबाइल नंबर काळजीपूर्वक भरा. नंबरमध्ये चूक होणार नाही, याची खात्री करा.

Aadhar Card New Update | Sarkarnama

स्टेप 4 – बायोमेट्रिक पडताळणी

अर्जानंतर तुमची ओळख पडताळली जाईल. यासाठी बोटांचे ठसे किंवा इतर उपलब्ध बायोमेट्रिक पद्धतीचा वापर केला जाईल.

Aadhar Card New Update | Sarkarnama

स्टेप 5 – शुल्क भरा

मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी निर्धारित शुल्क भरा. त्यानंतर तुम्हाला अर्जाची पावती दिली जाईल.

Aadhar Card New Update | Sarkarnama

URN नंबर जपून ठेवा

पावतीवर URN म्हणजेच अपडेट रिक्वेस्ट नंबर दिलेला असतो. या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही आधार अपडेटचे स्टेटस तपासू शकता.

Aadhar Card | Sarkarnama

अपडेट झाले की नाही, कसे तपासाल?

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन URN च्या मदतीने अपडेटची स्थिती तपासा. नंबर अपडेट झाल्यानंतर आधारशी संबंधित सेवांसाठी नवीन मोबाइल नंबर वापरता येईल.

Aadhar Card | Sarkarnama

Next : विधानपरिषद आमदारांचे अधिकार काय?, पगार किती?; सामान्य जनतेला माहित नसलेल्या 5 गोष्टी!

येथे क्लिक करा