Rashmi Mane
मतदार यादीत आपले नाव शोधण्याची सर्वात सोपी पद्धत! आपले नाव मतदार यादीत आहे का? हे जाणून घेण्यासाठी ही सोपी प्रक्रिया नक्की जाणून घ्या.
मतदानाचा अधिकार वापरायचा असेल तर सर्वात पहिले काम म्हणजे मतदार यादीत आपले नाव नोंदलेले आहे का ते तपासणे. चूक किंवा नाव वगळले असल्यास वेळेत दुरुस्ती करता येते.
सुरुवात करा https://mahasecvoterlist.in या अधिकृत संकेतस्थळावरून.
हे पोर्टल महाराष्ट्रातील सर्व मतदार यादींसाठी उपलब्ध आहे.
होमपेजवर दिसणाऱ्या “Search Name in Voter List” या पर्यायावर क्लिक करा.
येथून तुम्ही दोन प्रकारे तपासणी करू शकता.
जर तुम्हाला EPIC क्रमांक आठवत नसेल तर काळजी करू नका. फक्त तुमचे पूर्ण नाव, जिल्हा, मतदारसंघ व इतर आवश्यक तपशील भरा आणि शोधा.
तुमच्याकडे EPIC (मतदार ओळखपत्र) क्रमांक असेल तर ही सर्वात जलद पद्धत.
फक्त क्रमांक टाइप करा आणि एका क्लिकमध्ये आपले नाव दिसेल.
स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रकार
जिल्हा
विधानसभा मतदारसंघ
नगरपरिषद/नगरपंचायत
स्वतःचे पूर्ण नाव
हे तपशील योग्य भरल्यास शोध 100% अचूक होतो.
फक्त नावच नव्हे, तर तुमचे मतदान केंद्र (Polling Station) कुठे आहे हेही या संकेतस्थळावर स्पष्ट पाहता येते.