How to Create Farmer ID : 'पीएम किसान'चा 21 वा हप्ता हवाय? मग लगेच बनवा 'फार्मर आयडी'; जाणून घ्या सोपी प्रक्रिया!

Rashmi Mane

पीएम किसानचा 21वा हप्ता

पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आज (19 नोव्हेंबरला) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. पण 'फार्मर आयडी' नसणाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे.

Farmer ID | sarkarnama

21व्या हप्त्याची मोठी घोषणा

देशभरातील 11 कोटी शेतकऱ्यांना 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यात सुरुवात झाली आहे. 20 वी हप्ता 2 ऑगस्टला दिला गेला होता.

Farmer ID | Sarkarnama

फार्मर आयडी नसल्यास...

ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तयार केलेली नाही, त्यांचे पैसे अडकू शकतात.
अनेक राज्यांत मोठ्या प्रमाणावर शेतकरी रजिस्ट्रेशनपासून वंचित आहेत.

Farmer ID | Sarkarnama

मग फार्मर आयडीची गरज का?

ही फक्त औपचारिकता नाही. तर फार्मर आयडीत शेतकऱ्याचे संपूर्ण डेटा डिजिटल स्वरूपात असतो. सरकारी योजनांचा फायदा जलद आणि पारदर्शकपणे मिळण्यासाठी ही आयडी महत्वाची आहे.

Farmer ID | Sarkarnama

फार्मर आयडी कशी तयार कराल?

1. आपल्या राज्याच्या Agristack पोर्टलवर जा https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
2. Create New User वर क्लिक करा, रजिस्ट्रेशन सुरू करा.

Farmer ID | Sarkarnama

फार्मर आयडी प्रक्रिया

3. आधार नंबर टाईप करा आणि KYC सुरू करा. शर्ती व्यवस्थित वाचा आणि Submit करा. 4. आधार लिंक मोबाइलवर आलेल्या OTP ने व्हेरिफाय करा.

Farmer ID | Sarkarnama

फार्मर आयडी प्रक्रिया (Step 3)

5. पुन्हा मोबाइल नंबर टाईप करा, OTP टाका.
6. नवीन पासवर्ड तयार करा. तो सुरक्षित ठेवा. यानंतर तुम्हाला लॉगिनसाठी आयडी-पासवर्ड मिळेल.

Farmer ID | Sarkarnama

फार्मर आयडीचे फायदे

या फार्मर आयडीमुळे योजनांचे लाभ थेट खात्यात येण्यास मदत होते. तसेच चुकीच्या नोंदी टाळता येतात. भविष्यातील कृषी योजनांसाठी एकच ओळखपत्र असते. जमीन, पिके, पशुधन यांचा डिजिटल रेकॉर्ड तयार करता येतो.

Farmer ID | Sarkarnama

Next : लालूंची कन्या रोहिणी आचार्य 'सुपर रिच'! 'नेट वर्थ' तेजस्वीपेक्षा 4 पटीनं जास्त, पतीही बक्कळ श्रीमंत 

Sarkarnama
येथे क्लिक करा