Rohini Yadav Net Worth : लालूंची कन्या रोहिणी आचार्य 'सुपर रिच'! 'नेट वर्थ' तेजस्वीपेक्षा 4 पटीनं जास्त, पतीही बक्कळ श्रीमंत

Rashmi Mane

लालू परिवारात प्रचंड बवाल!

लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात भीषण वाद उफाळून आला आहे. रोहिणी आचार्य विरुद्ध तेजस्वी यादव असा संघर्ष समोर आला आहे. हा कौटुंबिक कलह आता राजकीय रंग घेत आहे.

Sarkarnama

रोहिणी-तेजस्वी आमनेसामने

कुटुंबातील वाद चिघळत असताना दोघांचे आर्थिक साम्राज्यही चर्चेत आहे. किडनी दान करणाऱ्या रोहिणीने भावावर उघडपणे टीका करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.

Sarkarnama

तेजस्वी यादव यांची नेटवर्थ

तेजस्वी यादव यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेल्या शपथपत्रात त्यांची एकूण 8.1 कोटींच्या नेटवर्थची माहिती दिली होती. यात 6.12 कोटींची जंगम मालमत्ता आणि 1.88 कोटींची स्थावर मालमत्ता आहे.

Sarkarnama

रोकड

उमेदवारीच्या वेळी त्यांच्या जवळ 1.5 लाख रुपये रोख आणि बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांची रक्कम असल्याचे नमूद होते. त्यांच्यावर 1.35 कोटींची सरकारी देणी आणि 55.55 लाखांचे इतर कर्ज आहे.

Sarkarnama

रोहिणी आचार्य यांची संपत्ती

रोहिणी आचार्य या एकूण 36.62 कोटींच्या मालमत्तेच्या मालकीण आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सारणमधून उमेदवारी भरताना त्यांनी ही माहिती सादर केली होती.

Sarkarnama

रोहिणीचे दागिने व इतर मालमत्ता

त्यांच्या नावावर 495 ग्रॅम सोनं, 5.50 किलो चांदी, 5 लाखांचे रत्ने, 1 कोटींची कमर्शियल बिल्डिंग, तसेच मुंबई आणि पटना येथे मिळून सुमारे 11 कोटींच्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज आहेत. त्यांच्यावर 1.30 कोटींचे कर्जही आहे.

Sarkarnama

समरेश सिंह यांची संपत्ती

रोहिणींचे पती समरेश सिंह हेही मोठे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. दोघांचा विवाह 2002 मध्ये झाला. त्यांनी INSEAD मधून MBA केले आहे आणि सिंगापूर व जकार्तातील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. सध्या ते सिंगापूरमधील Evercore मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून कार्यरत आहेत.

Sarkarnama

समरेश सिंह यांची मालमत्ता

समरेश सिंह यांच्या मालमत्तेत 10 लाखांची रोख रक्कम, 1.5 कोटींपेक्षा जास्त बँक डिपॉझिट, 2 कोटींचे शेअर्स-बॉण्ड्स, 15 लाखांची इंश्युरन्स, 40 लाखांची कार आणि 32 लाखांची दागिने आहेत. त्यांच्या नावावर 1.27 कोटींची शेत जमीन, 39 लाखांची नॉन-अॅग्रीकल्चर जमीन आणि मुंबईतील अंदाजे 10 कोटींचे दोन फ्लॅट्स यांसह इतर शहरांतही मालमत्ता आहे.

Sarkarnama

Next : एबी फाॅर्म उमेदवार अन् पक्षासाठी किती महत्त्वाचा असतो 

येथे क्लिक करा