Rashmi Mane
निकृष्ट अन्न, कालबाह्य औषध, जादा दर किंवा फसवणूक झाली आहे? आता घरबसल्या ऑनलाइन तक्रार करून संबंधितांवर कारवाईची मागणी करता येते.
महाराष्ट्र शासनाच्या 'आपले सरकार' तक्रार निवारण पोर्टलवर किंवा FDA महाराष्ट्राच्या अधिकृत माध्यमातून तक्रार नोंदवता येते. आवश्यक असल्यास NCH चाही वापर करू शकता.
सर्वप्रथम 'आपले सरकार' तक्रार निवारण पोर्टलला भेट द्या. नवीन वापरकर्ता असल्यास नोंदणी करा आणि लॉगिन करून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करा.
'Post Grievance' पर्याय निवडा. त्यानंतर 'Food and Drugs Administration Department' हा विभाग निवडून अन्न किंवा औषधाशी संबंधित तक्रारीचा प्रकार निवडा.
हॉटेल किंवा मेडिकलचे नाव, पत्ता, घटना घडलेली तारीख, जिल्हा आणि नेमकी काय समस्या झाली याची स्पष्ट व सविस्तर माहिती लिहा.
बिल, फोटो, व्हिडिओ किंवा इतर उपलब्ध पुरावे अपलोड करा. सर्व माहिती तपासल्यानंतर तक्रार सबमिट करा. त्यानंतर मिळालेल्या Grievance ID द्वारे तक्रारीची स्थिती पाहता येते.
ऑनलाइन तक्रार शक्य नसेल तर FDA महाराष्ट्राच्या टोल-फ्री क्रमांक 1800-222-365 वर संपर्क साधा. ग्राहक फसवणुकीसाठी National Consumer Helpline (1915) किंवा त्यांचे ॲपही वापरता येते.
बिल सुरक्षित ठेवा आणि त्यावरील दुकानाचे नाव, GST क्रमांक व तारीख स्पष्ट असावी. औषधांच्या तक्रारीत बॅच नंबर व एक्सपायरी डेट नमूद करा. अचूक माहिती आणि पुरावे दिल्यास तक्रारीवर जलद कारवाई होण्याची शक्यता वाढते.