महिलांनो, सरकार थेट तुमच्या खात्यात देतंय मदत! 10 सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Rashmi Mane

महिलांसाठीच्या 10 सरकारी योजना

केंद्र आणि राज्य सरकारकडून महिलांच्या शिक्षण, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि सुरक्षित भविष्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांचा लाभ घेतल्यास महिलांना मोठा आर्थिक आधार मिळू शकतो.

लाडकी बहीण योजना

पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. नियमित आर्थिक सहाय्यामुळे महिलांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होते.

सुकन्या समृद्धी योजना

मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी बचत करण्याची ही लोकप्रिय योजना आहे. कमी गुंतवणुकीत आकर्षक परतावा मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

उज्ज्वला योजना

गरीब कुटुंबातील महिलांना मोफत एलपीजी गॅस जोडणी देऊन धूरमुक्त स्वयंपाकघराची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यामुळे आरोग्य आणि वेळ दोन्हीची बचत होते.

मातृत्व लाभ योजना

गर्भवती आणि स्तनदा महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना राबवली जाते. आई आणि बाळाच्या आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी हा लाभ महत्त्वाचा ठरतो.

महिला सन्मान बचत योजना

महिलांसाठी सुरक्षित बचतीचा पर्याय म्हणून ही योजना लोकप्रिय आहे. निश्चित कालावधीत चांगला परतावा मिळवण्याची संधी उपलब्ध होते.

मुद्रा व स्वयंरोजगार योजना

स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांना कर्ज आणि आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. यामुळे महिला उद्योजकतेला चालना मिळते.

अर्ज करण्यापूर्वी हे तपासा

प्रत्येक योजनेचे पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया वेगवेगळी असते. अधिकृत संकेतस्थळ किंवा संबंधित सरकारी कार्यालयातून माहिती घेऊनच अर्ज करा आणि उपलब्ध योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्या.

Next : लाखो फॉलोअर्स, पण एक चूक भोवली अन् द्यावा लागला सरकारी नोकरीचा राजीनामा! 

येथे क्लिक करा