Rajanand More
ऑरगॅनिक म्हणजे सेंद्रिय पध्दतीने म्हणजे कोणत्याही कत्रिम पदार्थांचा वापर न करता किंवा शेतामध्ये रसायनांचा वापर तयार न करता उत्पादित खाद्यान्नांना ऑरगॅनिक म्हटले जाते.
ऑरगॅनिकचा दावा करणारी अनेक पॅकेज्ड उत्पादने सध्या बाजारात आहेत. पण काहीवेळा ग्राहकांच्या या नावाखाली फसवणूकही होते. पण तुम्हाला Organic उत्पादने ओळखणे अत्यंत सोपं आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून याबाबत जनजागृती केली जात आहे. प्रत्येक उत्पादन खरोखरच सेंद्रिय असेलच असे नाही. त्यासाठी तुम्हाला उत्पादनांच्या पॅकेजिंगवर तीन लोगो पाहावे लागतील.
FSSAIने दिलेल्या माहितीनुसार, उत्पादने खरेदी करण्यापूर्वी ‘Jaivik Bharat’ लोगो आणि India Organic (NPOP) किंवा PGS-India Organic यापैकी संबंधित प्रमाणपत्र अवश्य तपासा.
तीन लोगो नसतील, तर FSSAI च्या म्हणण्यांनुसार संबंधित उत्पादन सेंद्रिय नसेल. त्यांच्याकडून केला जात असल्याचा दावा खोटा असू शकतो. त्यामुळे ग्राहकांनी काळजीपूर्वक उत्पादनांची खरेदी करावी.
पॅकेजिंगच्या पुढील भागापेक्षा मागील बाजू अधिक महत्त्वाची आहे. उत्पादनाच्या मागील बाजूस त्यातील घटक, पोषणमूल्य, एक्सपायरी तारीख, अॅलर्जन्स आणि FSSAI परवाना यांची माहिती दिलेली असते.
पॅकेज्ड खाद्यपदार्थ खरेदी करण्यापूर्वी ३० सेकंदांचा वेळ द्या. पॅक उलटा करून त्यावरील महत्त्वाची माहिती वाचल्याने अधिक योग्य आणि सुरक्षित खाद्यपदार्थ निवडण्यास मदत होते. घटकांची यादी (Ingredients) नक्की वाचा.
मागील बाजूवर निव्वळ वजन, उत्पादनाची तारीख आणि वापरण्याची मुदत तपासा. ‘लेबल वाचा आणि मगच खा’ हा नियम पाळा. खाद्यपदार्थांवरील माहिती समजून घेऊन निर्णय घेतल्यास अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि माहितीपूर्ण खाद्यनिवड करता येते.