आता इंटरनेटशिवाय करा UPI पेमेंट, वापरा ही सोपी पद्दत

Ganesh Sonawane

इंटरनेट नसतानाही आता UPI ट्रान्सफर शक्य आहे. भारत सरकारने ने खास *99# ही सेवा सुरु केली आहे.

*99# | Sarkarnama

स्मार्टफोनची गरज नाही

ही USSD आधारित UPI सेवा आहे. ही सेवा *99# क्रमांकाद्वारे काम करते. स्मार्टफोनची गरज नाही. जुन्या कीपॅड फोनवरही ही सेवा वापरता येते.

*99# | Sarkarnama

*99#

फक्त *99# डायल करा आणि पैसे पाठवा. यासाठी इंटरनेटची गरज लागत नाही.

*99# | Sarkarnama

पाच हजाराची मर्यादा

भाषा निवडून UPI आयडी टाका आणि पिनने व्यवहार पूर्ण करा. याद्वारे 5000 रुपयांपर्यंत पैसे ट्रान्सफर करता येतात.

*99# | Sarkarnama

नेटवर्क

*99# सेवा 24×7 उपलब्ध आहे, कोणत्याही वेळी वापरा. Airtel, Jio, Vi, BSNL यांसारख्या सर्व नेटवर्कवर चालते.

*99# | Sarkarnama

अशी आहे प्रोसेस..

सर्वप्रथम मोबाईलच्या डायल पॅडवर *99# हा कोड टाका आणि कॉल करा. त्यानंतर तुमच्यासमोर भाषेची निवड करण्याचा पर्याय दिसेल. पसंतीची भाषा निवडल्यानंतर ‘1’ डायल करा. यानंतर, ज्या UPI आयडीवर तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत ती माहिती प्रदान करा. यानंतर UPI पिन टाकण्यास सांगितले जाईल. पिन व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही समोरच्या व्यक्तीला पैसे पाठवू शकाल.

UPI पिन कसा तयार करायचा?

मोबाईलच्या डायलरवर *99# हा कोड डायल करा आणि कॉल करा. स्क्रीनवर येणाऱ्या पर्यायांमधून भाषा निवडा. त्यानंतर ‘Set UPI PIN’ हा पर्याय निवडा – तो सहसा पाचव्या क्रमांकावर असतो. पुढे, तुमच्या बँक खात्याच्या शेवटचे सहा अंक आणि डेबिट कार्डची एक्सपायरी तारीख भरावी लागते. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, जो तिथे टाकावा. यानंतर तुम्हाला UPI ​​पिन सेट करण्यास सांगितले जाईल.

*99# | Sarkarnama

NEXT : आता मोबाईल अ‍ॅपद्वारे करा मतदान, जाणून घ्या प्रक्रिया!

Mobile App Voting | sarkarnama
येथे क्लिक करा