Roshan More
बिहारमध्ये पार पडलेल्या सहा नगरपालिका निवडणुकीमध्ये इतिहास रचला गेला. प्रथमच मोबाईलद्वारे अॅपच्या माध्यमातून मतदारांनी मतदान केले.
देशात प्रथमच मोबाईल अॅपद्वारे मतदान बिहारमध्ये झाले. ऑनलाईन मतदान करण्यासाठी पूर्वी नोंदणी आवश्यक आहे.
ई-मतदानाबाबत राज्य निवडणूक आयोग निर्णय घेत असतो. तुम्ही ज्या राज्यात राहता त्या राज्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तुम्ही ई-मतदान करू शकता की नाही ते ठरते.त्यामुळे महाराष्ट्रातील ई मतदानाचा निर्णय राज्य निवडणूक आयोग घेईल.
बिहार निवडणूक आयोगाने e-SECBHR अॅप लाॅन्च केले होते. त्याद्वारे ऑनलाईन मतदान करता आले.
e-SECBHR अॅप डाउनलोड करावे लागते. या अॅपमध्ये मतदार यादीत नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करा.एकदा मोबाईल क्रमांकाचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मतदान करू शकता.
मोबाईल क्रमांकाचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा मतदानाच्या दिवशी e-SECBHR अॅपद्वारे स्वतः मतदान करू शकता.
ई-मतदानाची सुविधा जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत त्यांचीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
जेष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला और स्थलांतरित मजूर यांना बिहारच्या सहा नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार होता.