Rahul Gadkar
कोल्हापूर जिल्ह्यात शहरात राहून ग्रामीण भागाचे प्रतिनिधीत्व करणारे अनेक आमदार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व आजी-माजी आमदार व खासदार यांची वडिलोपार्जित घरे व नवीन घरे आपापल्या मतदारसंघात आहेत
हातकणंगले लोकसभा मतदार संघांचे खासदार धैर्यशील माने हे कोल्हापूरमधील रुईकर कॉलनी येथे राहतात.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ऋतुराज पाटील हे देखील कोल्हापूर उत्तरमध्ये कसबा-बावडा येथे राहतात.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांचे आमदर अमल महाडिक हे हातकणंगले तालुक्यातील शिरोली पुलाची येथे राहतात.
करवीर विधानसभा मतदार संघांचे आमदार चंद्रदिप नरके हे शहरातील शिवाजी पेठ येथे राहतात.
चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील हे कर्नाटकातील बेळगाव येथे राहतात