Ganesh Sonawane
जगातील सर्वात वॉन्टेड दहशतवादी ओसामा बिन लादेन अनेक वर्षे अमेरिकेच्या रडारवर होता. 9/11 च्या हल्ल्यानंतर त्याला पकडणे किंवा ठार करणे हे प्रमुख लक्ष्य बनले.
अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नेतृत्वात लादेनला मारण्यासाठी 'नेपच्यून स्पीयर' हे गुप्त ऑपरेशन सुरु केलं.
ओसामा पाकिस्तानातील अबोटाबाद येथील एका अलिशान हवेलीमध्ये स्वतःच्या पूर्ण परिवारासह राहत असल्याची माहिती मिळाली. हे ठिकाण पाकिस्तान मिलिटरी अकादमीच्या जवळच होतं.
१ मे २०११ च्या मध्यरात्री ७९ अमेरिकन सैन्यांना घेऊन चार हेलिकॉप्टर पाकिस्तानातील अबोटाबादच्या दिशेने निघाले.
चारही हेलिकॉप्टर २ मे रोजी पहाटे १ वाजता अबोटाबाद येथील लादेन राहत असलेल्या कंपाउंडमध्ये उतरले.
एका हेलिकॉप्टरची मागची बाजू कंपाऊंडच्या भिंतीवर आदळून ते क्रॅश झाले. त्यामुळे सैनिकांनी योजना बदलत छताऐवजी थेट जमिनीवर उतरले.
बिन लादेनचा विश्वासू अबू अहमद अल-कुवैती यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर सैनिक मुख्य इमारतीत घुसले, जिथे त्यांनी अल-कुवैतीचा भाऊ आणि बिन-लादेनचा मुलगा खालिद यांना ठार मारले.
शेवटी, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचताच ओसामा बिन लादेन सापडला. त्यांनी लादेनच्या चेहर्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला ठार मारले.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या अत्यंत जवळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सिच्युएशन रूम’मध्ये बसून लादेनवरची कारवाई लाईव्ह बघितली.