30 सेकंद अन् 30 बॉम्ब... इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांना कसं मारलं?

Ganesh Sonawane

खामेनेई यांचा मृत्यू

इराणवर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे मोठा लष्करी हल्ला केला. ज्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला.

Ayatollah Ali Khamenei Death | Sarkarnama

30 सेकंद

मीडिया रिपोर्टनुसार, या हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात अवघ्या 30 सेकंदांत इराणमधील 3 महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करण्याप्त आले.

Ayatollah Ali Khamenei Death | Sarkarnama

30 नेते, अधिकाऱ्यांचा मृत्यू

या हल्ल्यांमध्ये खामेनेई यांच्यासह इराणमधील सुमारे 30 मोठ्या राजकीय नेत्यांचा आणि लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

Ali Khamenei Death | Sarkarnama

मुलगी-जावई ठार

अयातुल्ला अली खामेनेई यांची मुलगी, जावई, नातू व सुन यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

Ayatollah Ali Khamenei Death | Sarkarnama

मोसद

खामेनी हे इराणमधील त्यांच्या राजवाड्यात त्यांच्या जवळच्या सल्लागारांसोबत बैठक घेत होते. पण या बैठकीची माहिती इस्रायली गुप्तचर संस्था मोसदला कोणीतरी दिली.

Ayatollah Ali Khamenei Death

तत्काळ हल्ला

मोसादला किती वाजता बैठक होणार आहे आणि तेथे कोण उपस्थित राहणार आहे याची माहिती मिळाली म्हणूनच इस्रायलने सकाळी तत्काळ हल्ला करण्याचा निर्णय घेतला.

Ayatollah Ali Khamenei Death

रात्री हल्ल्याची योजना

मुळात इस्रायलने सुरुवातीला रात्री हल्ला करण्याची योजना आखली होती, परंतु खामेनेई यांच्याबद्दल माहिती मिळताच, तात्काळ हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Ayatollah Ali Khamenei Death | Sarkarnama

30 बॉम्ब

अमेरिका-इस्रायलने थेट खामेनेई ज्या ठिकाणी राहत होते, त्याच ठिकाणाला लक्ष्य केले. काही रिपोर्ट्सनुसार, खामेनेईंच्या ठिकाणावर सुमारे 30 शक्तिशाली बॉम्ब टाकण्यात आले.

Nuclear Bombs | sarkarnama

NEXT : खामेनेईंच्या हत्येनंतर बदला घेण्याची शपथ घेणारे अहमद वहीदी कोण? इराणच्या सेनेचे करणार नेतृत्व

Ali Khamenei Death; Ahmad Vahidi new IRGC commander | sarkarnama
येथे क्लिक करा