Pradeep Pendhare
निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक असते. पण ही यादी तयार कोण करतं? BLO पासून मुख्य निवडणूक आयुक्तांपर्यंत कोणाची काय भूमिका असते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
BLO म्हणजेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी! मतदारांच्या नोंदींची क्षेत्रीय पडताळणी करणे, अर्जांबाबत माहिती गोळा करणे आणि अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवणे ही त्यांची महत्त्वाची कामे असतात.
मतदार नोंदणी अधिकारी म्हणजेच ERO! मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नोंदींबाबत आलेले अर्ज आणि हरकती तपासणीवर निर्णय घेऊन मतदार यादी अद्ययावत करतात.
जिल्हा निवडणूक अधिकारी अर्थात जिल्हाधिकारी निवडणूकविषयक कामकाजाचा समन्वय आणि देखरेख करतात. मतदार यादीच्या कामातही संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी हे भारत निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली राज्यातील निवडणूकविषयक कामकाजावर देखरेख करतात. मतदार यादीच्या तयारी आणि अद्ययावतीकरणात आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी महत्त्वाची ठरते.
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 324 नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकांच्या अधीक्षण, निर्देशन आणि नियंत्रणाची घटनात्मक जबाबदारी आहे. मतदार यादीच्या तयारीसाठीही आयोग नियम आणि निर्देशांनुसार यंत्रणेचे मार्गदर्शन करतो.
मतदार यादीची प्रक्रिया केवळ कागदोपत्री नसते. मतदार अर्ज, BLO कडून पडताळणी, AERO/EROकडून छाननी आणि दावे-हरकतींनंतर मतदार यादीचे प्रकाशन होते.
मतदार यादीत नाव नसल्यास, नवीन नोंदणीसाठी Form 6 भरता येतो. दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी Form 8 . हरकत किंवा नाव वगळण्यासाठी Form 7 लागू होतो.