HSRP update : गाडीला HSRP नंबर प्लेट बसवायची राहून गेलीय? मग 'ही' बातमी तुमच्यासाठीच; सरकारने दिली मोठी सूट!

Rashmi Mane

सरकारचा मोठा निर्णय!

गाडीला HSRP नंबर प्लेट बसवायची राहून गेलीय? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सरकारने राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत आता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अजून नंबर प्लेट बसवली नाही, त्यांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

HSRP Number Plate | Sarkarnama

नवीन मुदत

राज्य सरकारने HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 पर्यंत वाढवली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. त्यामुळे वाहनधारकांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

HSRP Number Plate | Sarkarnama

आधीही मिळाली होती मुदतवाढ

याआधी HSRP नंबर प्लेटसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्याप राज्यातील अनेक वाहनांनी नंबर प्लेट बसवलेली नाही. कामाचा वेग लक्षात घेऊन सरकारने आणखी 6 महिन्यांची वाढ दिली होती.

1 जुलै 2026 पासून होणार कारवाई

सरकारने स्पष्ट इशारा दिला आहे की, 1 जुलै 2026 पासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना 1000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

HSRP नंबर प्लेट का महत्त्वाची?

HSRP नंबर प्लेट ही वाहन सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्लेटमध्ये खास सुरक्षा फीचर्स असतात. त्यामुळे वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि गुन्हेगारी प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

एजंटपासून सावध राहा!

परिवहन विभागाने वाहनधारकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. HSRP नंबर प्लेट फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच बुक करावी. कोणत्याही एजंट किंवा बनावट वेबसाईटवर विश्वास ठेवू नये.

अर्ज कसा कराल?

सर्वप्रथम परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर “Apply High Security Registration Plate Online” या पर्यायावर क्लिक करा. पुढे वाहन क्रमांक, चेसीस नंबर आणि इंजिन नंबर भरून पेमेंट पूर्ण करावे लागेल.

अपॉइंटमेंट बुक करा

ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट मिळेल. त्यानंतर जवळच्या अधिकृत एजन्सीत अपॉइंटमेंट घेऊन ठरलेल्या दिवशी HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी लागेल. 30 जून 2026 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

Next : मोदींच्या दौऱ्यात भारताला ऐतिहासिक भेट! नेदरलँडकडून 11व्या शतकातील चोलकालीन ताम्रपटांचे हस्तांतरण

येथे क्लिक करा