Pradeep Pendhare
नेदरलँड दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, 11व्या शतकातील दुर्मिळ चोलकालीन ताम्रपट औपचारिकरित्या भारताकडे हस्तांतरीत करण्यात मोठे यश आले आहे.
युरोपमध्ये ‘लेडन प्लेट्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ताम्रपटांचा संबंध चोल साम्राज्याशी निगडीत असून, भारत सरकार 2012 पासून ताम्रपट पुनरागमनासाठी प्रयत्नशील होते.
ताम्रपट मूळतः तामिळनाडूतील नागपट्टणम परिसरातील असून, ते चोल राजवंशाच्या प्रशासन, दानव्यवस्था आणि सागरी सामर्थ्याच्या महत्त्वपूर्ण नोंदी मानले जाते.
नेदरलँडमधील लेडन विद्यापीठाने जतन केलेल्या ताम्रपटांमध्ये 21 मोठे अन् तीन लहान ताम्रपटांचा समावेश आहे.
या ताम्रपटांचे एकूण वजन सुमारे 30 किलो असून, त्यावर संस्कृत आणि तमिळ भाषेत लेखन कोरलेले आहे.
या ताम्रपटांवर राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडिल राजराज चोल प्रथम यांच्या वचनाची अधिकृत नोंद असून, बौद्ध विहाराला गावांच्या महसुलातून देणगीची माहिती मिळते.
पंतप्रधान मोदी यांनी हस्तांतरणाच्या या घटनेला, प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा क्षण, असे संबोधले. नेदरलँडचे पंतप्रधान Rob Jetten यांच्या उपस्थितीत समारंभ झाला.
लेडन विद्यापीठाने ताम्रपट वसाहतकालीन काळात भारतातून नेण्यात आल्याचे मान्य केले. नेदरलँडच्या ‘Colonial Collections Committee’ने हे ताम्रपट भारताला हस्तांतरण करण्याची शिफारस केली होती.