Aslam Shanedivan
Hurun India Rich List 2025 मध्ये जगभरात अनेक श्रीमंत व्यक्ती असून भारतातही काही कोट्याधीश आहेत. यात मुकेश अंबानी आणि गौतम आदानीही आहेत
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत. परंतु हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार, गेल्या एका वर्षात त्यांची संपत्ती 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत ही घसरण प्रामुख्याने कंपनीच्या वाढत्या कर्जामुळे झाली आहे.
पण अदानी समूहाचे प्रमुख गौतम आदानी यांच्या संपत्तीत 13 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ते या लिस्टमध्ये ते दुसऱ्या क्रमाकांवर गेले आहेत.
हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार यंदा त्यांच्या संपत्तीत 13 टक्क्यांनी वाढ झाली असून ती 8.4 लाख कोटींवर गेली आहे. ते जागतिक स्तरावर 18 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज 8.6 लाख कोटी रुपये
गौतम अदानी अदानी समूह 8.4 लाख कोटी रुपये
रोशनी नादर एचसीएल एंटरप्राइज 3.5 लाख कोटी रुपये
दिलीप संघवी सन फार्मा 2.5 लाख कोटी रुपये
अझीम प्रेमजी विप्रो 2.2 लाख कोटी रुपये
कुमार मंगलम बिर्ला आदित्य बिर्ला ग्रुप 2 लाख कोटी रुपये
सायरस पूनावाला सायरस पूनावाला ग्रुप 2 लाख कोटी रुपये
नीरज बजाज बजाज ऑटो 1.6 लाख कोटी रुपये
रवी जयपुरिया आरजे कॉर्प 1.4 लाख कोटी रुपये
राधाकिशन दमानी डी मार्ट 1.4 लाख कोटी रुपय
जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींमध्ये टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलन मस्क जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले असून ते पाच वर्षांच्या कालावधीत चौथ्यांदा अव्वल ठरले आहेत.