PM Kisan yojana : पती-पत्नी दोघेही घेतायत PM किसान योजनेचा लाभ? सरकारकडून तपासणी सुरू, होऊ शकते मोठी कारवाई!

Rashmi Mane

पीएम किसान योजना

देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Yojana) आज सर्वाधिक लोकप्रिय योजनांपैकी एक आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

आर्थिक मदत

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये त्यांच्या खात्यात जमा केली जाते. मात्र, एका कुटुंबातील फक्त एका सदस्यालाच या योजनेचा लाभ घेण्याचा नियम आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

धक्कादायक बाब उघड

पण आता केंद्र सरकारच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देशभरात तब्बल 17 लाख प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे.

PM Kisan yojana | sarkarnama

तपासामध्ये उघड

ही माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने केलेल्या तपासात समोर आली आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

व्हेरिफिकेशन करणार

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवून दुहेरी लाभ घेणाऱ्या कुटुंबांची सखोल चौकशी आणि व्हेरिफिकेशन करण्याचे निर्देश दिले आहेत.

PM Kisan Yojana | Sarkarnama

सरकारी आकडेवारीनुसार

सरकारी आकडेवारीनुसार, एकूण 31.01 लाख प्रकरणांपैकी 19.2 लाख लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाले आहे. त्यामध्ये 17.87 लाख प्रकरणांमध्ये पती-पत्नी दोघेही लाभार्थी असल्याचे आढळले आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

अद्याप अधिकृत माहिती नाही

राज्य सरकारांना या बाबत उत्तर देण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. अशा लाभार्थ्यांविरोधात सरकार कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे. मात्र, नेमकी शिक्षा काय असेल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

PM Kisan Yojana | Sarkarnama

काही राज्यांतील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

दरम्यान, शेतकऱ्यांना PM Kisan योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट लवकरच संपणार आहे. सरकारने नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्मू-कश्मीरमधील 8.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 21वा हप्ता आधीच वितरित केला आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

सरकारकडून दिलासादायक माहिती

मात्र, इतर राज्यांतील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता आहे.

PM Kisan Yojana | Sarkarnama

Next : लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता लवकरच खात्यात? दिवाळीपूर्वी मिळणार पैसे!

येथे क्लिक करा