Sunil Balasaheb Dhumal
तेलंगणा या स्वातंत्र्य राज्याची स्थापना अनेक वर्षांच्या लढ्यानंतर झाली.
फेब्रुवारी 2014 मध्ये संसदेत आंध्र प्रदेश पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यात आले.
त्यानंतर अधिकृतपणे 2 जून 2014 रोजी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही दोन राज्य वेगळी झाली.
आंध्र प्रदेश पुनर्रचना 2014 कायद्यानुसार हैदराबाद ही 10 वर्षांसाठी दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी झाली.
या कायद्यातील उपकलम (1) नुसार कालावधी संपल्यानंतर, हैदराबाद ही तेलंगणा राज्याची राजधानी होणार आहे.
आता कालावधी पूर्ण झाल्याने आंध्र प्रदेश राज्याला आपली नवी राजधानी शोधावी लागणार आहे.
विभाजन होऊन दहा वर्षे उलटूनही आंध्र प्रदेशाला आपली राजधानी ठरवता आलेली नाही.
आंध्राच्या राजधानीवरून आमरावती आणि विशाखापट्टनमचा वाद न्यायालयात सुरू आहे.
मुख्यमंत्री रेड्डींचे आमरावतीला प्रशासकीय, विशाखापट्टनममध्ये विधानसभा तर कर्नूल ही ज्युडीशिअल राजधानी करण्याचे नियोजन आहे.