Jagdish Patil
निजामशाहीचं साक्षीदार असलेलं हैदराबाद देशात सौंदर्याची एक वेगळीच ओळख निर्माण करतं. आजही इथे इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा पाहायला मिळतात.
याच हैदराबादमध्ये चार वर्षांपूर्वी मोठी खळबळ उडाली होती, जेव्हा निजाम म्युझियममध्ये दरोडा पडला होता.
3 सप्टेंबर 2018 च्या रात्री दोन चोरट्यांनी निजाम म्युझियममधील जुन्या हवेलीतील अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या.
ज्यामध्ये म्युझियममधील निजामांचा मौल्यवान सोन्याचा डब्बा सॉसर आणि सोन्याचे चमच्यांचा समावेश होता.
म्युझियममधील जुन्या हवेलीतील सोन्याच्या डब्याचे वजन 2 किलो होते. त्यावर रुबी आणि हिरे लावले होते.
हैदराबादवर 1911 ते 1948 राज्य केलेल्या सातवा निजाम, मीर उस्मान अली खानचा तो डबा होता.
या डब्याची किंमत त्याकाळी 60 लाख इतकी होती तर म्युझियममधून चोरी झालेल्या सर्व वस्तूंची किंमत 1 कोटींहून अधिक होती.
चोरटे दोरीच्या आधाराने म्युझियममध्ये घुसले आणि हवेलीमध्ये प्रवेश केला. यावेळी 4 फूट रुंद काच फोडून त्यांनी मौल्यवान वस्तू चोरल्या.
या वस्तू चोरल्यानंतर चोर मुंबईतील 5-स्टार हॉटेलमध्ये थांबले. आश्चर्याची बाब म्हणजे ते पोलीस त्यांना पकडेपर्यंत ते रोज चोरलेल्या भांड्यांतूनच जेवण करत होते.
चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी 22 पथके तैनात केली. चारमिनार परिसरातील CCTV फुटेजमध्ये चोरटे कैद झाले होते. या आधारे पोलिसांनी मुंबईतीमधून त्यांना अटक केली