Jagdish Patil
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे पती अनिश यांची राज्य सरकारच्या धोरणात्मक सल्लागार संस्थेतील ‘इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) च्या मानद सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीमुळे अंजली दमानियांवर टीका केली जात आहे. तर अनिश दमानियांची ज्या संस्थेत नियुक्ती झाली आहे. त्या संस्थेचं नेमकं काम काय असतं ते जाणून घेऊया.
मित्राचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपाध्यक्ष आहेत.
राज्याच्या गरजा लक्षात घेता खाजगी, गैर-सरकारी संस्थांच्या सहभागाद्वारे नीती आयोगाच्या धोरणाच्या धर्तीवर राज्याचा जलद विकास करण्यासाठी या संस्थेचा स्थापना केली आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी धोरणात्मक, तांत्रिक आणि कार्यात्मक दिशा प्रदान करण्यासाठी 'थिंक टँक' म्हणून ही संस्था काम करते.
सरकारच्या विविध विभागांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना करणे, विविध विभाग, केंद्र सरकार आणि खाजगी व्यावसायिक संघटनांमध्ये संवाद घडवणे.
विकासाचे नवीन उपाय सुचवणे, कमी प्रगती असलेल्या शहर, तालुक्यांच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी आणि त्यांच्या प्रगतीचा नियतकालिक आढावा घेणे.
ही संस्था कृषी, आरोग्य, शिक्षण, बांधकाम क्षेत्र विकास, जमीन प्रशासन, वित्त, पर्यटन, क्रीडा, हवामान, उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण अशा 10 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.
ड्रोन तंत्रज्ञान, AI, इंटरनेट ऑफ थिंग्ज-IOT, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, रोबोटिक्स, अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशासनाला पूरक नाविन्यपूर्ण कल्पना सुचविण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.