सरकारनामा ब्यूरो
आयएएस अनुदीप दुरिशेट्टी हे तेलंगणातील मेटपल्ली या गावचे आहेत.
राजस्थान येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेंटेमेशन या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
यूपीएससी परीक्षेसाठी 2012 मध्ये अनुदीप यांचा पहिला प्रयत्न होता.
त्यांनी गूगल इंडिया इंटरनॅशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले.
काम करत असताना अनुदीप परिक्षेची तयारी करत होते.
चारही प्रयत्नात अपयश पचवल्यानंतर 2018 मध्ये पाचव्या प्रयत्नात देशात पहिली रँक मिळवत ते आयएएस झाले.
देशात पहिली रँक मिळवल्यानंतर त्यांची हैदराबादचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
ते एक उत्तम फुटबॉलपटू आहेत.