Rashmi Mane
उत्तर प्रदेश कॅडरमधील IPS अधिकारी आशना चौधरी आणि हरियाणा कॅडरचे IAS अभिनव सिवाच या दोघांच्या विवाहाची आयएएस-आयपीएस जोडी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे.
ट्रेनिंगदरम्यान झालेली पहिली भेट… नंतर झालेल्या संवादाने ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. दोघांची समज, मूल्ये आणि लक्ष्य एकच असल्याने नातं अधिक दृढ होत गेलं.
27 नोव्हेंबर रोजी आशना आणि अभिनव यांनी सात फेरे घेत आयुष्याची नवी सुरुवात केली.
उत्तर प्रदेशातील हापूरच्या पिलखुआची आशना लहानपणापासूनच गुणी विद्यार्थिनी. 12वीत तब्बल 96.5% गुण मिळवत तिने आपली चमक दाखवली.
आशनाने लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्लिश लिटरेचरमध्ये ग्रॅज्युएशन आणि साउथ एशियन युनिव्हर्सिटीतून इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये मास्टर्स केले. त्यानंतर UPSCची तयारी केली.
2022 च्या UPSC परीक्षेत आशनाने ऑल इंडिया रँक 116 मिळवून IPS अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. सध्या ती मथुरा येथे ASP म्हणून कार्यरत आहे.
अभिनव सिवाच हरियाणाच्या फतेहाबाद जिल्यातील गोरखपुर गावचा. UPSC 2022 मध्ये मिळवलेला AIR 12 वा क्रमांक मिळवत त्या आपले ध्येय पूर्ण केले. सध्या तो कुरुक्षेत्रच्या पिहोवा येथे SDM आहे.
दोघांच्या कुटुंबांनीही या नात्याला मनापासून होकार दिला. विवाह सोहळ्यात साधेपणा, आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.