सरकारनामा ब्यूरो
बिहारच्या या अधिकाऱ्याने यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवून कित्येक युवकांना प्रेरणा देत आहेत.
पटना येथील एका छोट्याशा गावात जन्म झालेल्या आदित्य यांनी केंद्रीय विद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले.शाळेत टाॅप करणारे
शाळेत नेहमी अव्वल राहणारे प्रेमबंधनात अडकले. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे अवघड गेले होते.
ही गोष्ट लक्षात येताच त्याचवेळी त्यांनी ठरवले की, 'आता आयएएस अधिकारी झाल्याशिवाय कोणत्याच गोष्टीत पडायचं नाही'.
केवळ अभ्यासावर फोकस करत इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्या आयआयटीचे शिक्षण घेत एमबीए केले.
शिक्षण झाल्यावर आयसीआयसीआय बँकेत एक वर्ष नोकरी केली आणि राजीनामा दिल्यानंतर यूपीएससीच्या तयारीला लागले.
तत्त्वज्ञान हा विषय ऑप्शनल विषय ठेवून तीनदा त्यांनी ही परीक्षा दिली आहे.
पहिले दोन अपयश बघून एका शिक्षकांने त्यांच्या वडिलांना चॅलेंज दिले की आदित्य IAS परीक्षा पास झाला तर ते त्यांची मिशी ऊडवून टाकतील.
यूपीएससी परीक्षेत त्यांना पास व्हायचेच होते. म्हणून अधिक अभ्यास करुन तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी 48 व्या रँकने यूपीएससी उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी झाले.