Mahadev Jankar : महादेव जानकर पवारांची ऑफर स्वीकारणार का?

Vijaykumar Dudhale

कांशीराम यांच्यापासून प्रेरणा घेऊन रासपची स्थापना

बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांच्या विचाराचा पगडा महादेव जानकर यांच्यावर होता. कांशीराम यांच्यापासून प्रेरणा घेऊनच जानकर यांनी 2003 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली.

Mahadev Jankar | Sarkarnama

राष्ट्रीय अध्यक्ष

राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

Mahadev Jankar | Sarkarnama

बारामतीत सुप्रिया सुळेंना दिली कडवी टक्कर

मागील 2014 च्या निवडणुकीत महादेव जानकर यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत सर्वांत कमी मताधिक्य सुप्रिया सुळे यांना मिळाले होते.

Mahadev Jankar | Sarkarnama

परभणी, माढ्यातून लढण्याची घोषणा

महादेव जानकर यांनी लोकसभेची निवडणूक परभणी आणि माढा दोन मतदारसंघांतून लढविण्याची घोषणा केली आहे

Mahadev Jankar | Sarkarnama

शरद पवारांची ऑफर

महाविकास आघाडीकडून माढ्याची जागा महादेव जानकर यांना सोडण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शविली आहे.

Mahadev Jankar | Sarkarnama

माढ्यातून दुसऱ्यांदा रिंगणात

माढ्यातून महादेव जानकर यांनी यापूर्वी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांना 98, 946 मते मिळाली होती.

Mahadev Jankar | Sarkarnama

महाविकास आघाडीसोबत जाणार का?

महादेव जानकर हे शरद पवार यांचे निमंत्रण स्वीकारून लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत एकत्र येणार का, याची उत्सुकता माढ्यात आहे.

Mahadev Jankar | Sarkarnama

नाराजीचा फायदा उचलणार का?

महायुतीकडून माढ्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे मोहिते पाटील हे नाराज झाले आहेत, त्यांच्या नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होऊ शकतो.

R

Mahadev Jankar | Sarkarnama

ठाकरेंच्या शिवसेनेची कोकणातील धडाडणारी बुलंद तोफ...

Vinayak Raut | Sarkarnama