IAS Amit Khare : मराठमोळ्या रिटायर्ड अधिकाऱ्याला PM मोदींनी पुन्हा बोलावलं : सी. पी. राधाकृष्णन यांचे नवे सचिव

Rashmi Mane

महत्त्वाची जबाबदारी

भारताचे माजी आयएएस अधिकारी अमित खरे यांची भारताचे उपराष्ट्रपती यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS officer (Rtd) Amit Khare | Sarkarnama

मराठमोळे अधिकारी

अमित खरे हे 1985 च्या बॅचमधील झारखंड कॅडरचे आयएएस अधिकारी होते. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1961 रोजी नागपूर येथे झाला.

IAS officer (Rtd) Amit Khare | Sarkarnama

प्रशासकिय कारकिर्द

अमित खरे यांचा प्रशासकिय कारकीर्दीतला प्रवास खूप महत्त्वाचा राहिला आहे. ते केंद्र सरकारमध्ये माहिती व प्रसारण सचिव तसेच शिक्षण सचिव या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते.

मोठे योगदान

नवी शिक्षण धोरण (NEP 2020) लागू करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले. त्यांच्या ईमानदार व कडक स्वभावामुळे त्यांची विशेष ओळख झाली. बिहारमधील प्रसिद्ध चारा घोटाळा उघड करण्यामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

IAS officer (Rtd) Amit Khare | Sarkarnama

निवृत्तीनंतर जबाबदारी

निवृत्तीनंतरही त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमता लक्षात घेता त्यांना पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे.

IAS officer (Rtd) Amit Khare | Sarkarnama

कामाचा मोठा अनुभव..!

याआधी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणूनही कार्यरत होते. त्यामुळे त्यांना प्रशासन, धोरण रचना आणि शासकीय कामकाज यांचा मोठा अनुभव आहे.

IAS officer (Rtd) Amit Khare | Sarkarnama

शैक्षणिक पार्श्वभूमी

अमित खरे हे दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजचे पदवीधर आहेत. पुढे त्यांनी भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) अहमदाबाद येथून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. शैक्षणिक आणि प्रशासकीय दोन्ही क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

IAS officer (Rtd) Amit Khare | Sarkarnama

Next : 10 वर्षांपेक्षा जुना आधार आता अपडेट करा फुकटात; UIDAIची महत्त्वाची घोषणा! 

येथे क्लिक करा