सरकारनामा ब्युरो
अनन्या दास सध्या त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहेत...
अनन्या दास यांचा जन्म ओडिशा येथे झाला येथेच त्यांच बालपण गेलं. त्यांचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते.
अनन्या या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी त्यांच प्राथमिक शिक्षण ओडिशा येथून पूर्ण केलं.
JEE (Joint Entrance Examination) परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी आयआयटी कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेकची पदवी मिळवली. तसेच बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स तेथून अर्थशास्त्र या विषयात मास्टर्स केले.
अनन्या यांनी ओरॅकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम केले. जयपूर येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंटर्न म्हणूनही काम केले.
अनन्यांनी 4 ते 5 नोकरी सोडून UPSC CSE परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली. संपूर्ण भारतातून16वा रँक मिळवला. त्यांना गुजरातमध्ये पोस्टिंग मिळाली.
ओडिशा केडरमधील IAS चंचल राणासोबत त्यांनी दुसरं लग्न केले आहे. अनन्या दास या सध्या ओडिशाच्या संबलपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहेत.