Aslam Shanedivan
राज्यातील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.
ही घटना ताजी असतानाच आता पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
यामध्ये बी.एच. पालवे, मनोज रानडे, शुभम गुप्ता, अंजली रमेश, झेनिथ चंद्र देवंथुला यांच्यासह अंजली रमेश यांचा समावेश आहे
राज्यातील या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या महाराष्ट्र केडरमध्येच करण्यात आल्या आहेत
पण अंजली रमेश यांचा मात्र केडरच बदलण्यात आला आहे. त्या मध्य प्रदेश कॅडरच्या 2020 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत.
अंजली रमेश यांना महाराष्ट्रात आणण्यात आलं असून त्यांच्याकडे हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.
अंजली रमेश यांनी मुंबईत एका खाजगी कंपनीत काम केलं असून त्यांचे वडील रमेश मीणा हे 1991 च्या बॅचचे तामिळनाडू कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. 2019 मध्ये युपीएससी परीक्षा 449 गुणांनी क्रँक करत त्या आयएएस झाल्या.