सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनी ईदनिमित्त मुस्लिमांलाठी मोठी घोषणा केली आहे. काय आहे ही घोषणा वाचा...
भाजपने रमझान ईद निमित्ताने गरीब मुस्लिमांना 'सौगात-ए-मोदी' हे किट देण्याची घोषणा केली आहे.
सौगात-ए-मोदी हे किट देशातील तब्बल 32 लाख मुस्लिमांना दिले जाणार आहे.
भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाकडून पक्षाचे 32 हजार पदाधिकारी 32 हजार मशिदींशी संपर्क साधून हे किट गरीब मुस्लिमांपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सौगात-ए-किट हे गरीब मुस्लिमांसाठी भेट असून यात ईद साजरी करण्यासाठी लागणारे साहित्य असणार आहे.
या किटमध्ये शेवया, खजूर, सुकामेवा, बेसन, तूप आणि महिलांसाठी सुती कपडे याचबरोबर अन्य गरजेच्या वस्तूंचा समावेश असू शकतो.
ही मोहिम मुस्लिम कुटुंबाचा ईदचा आनंद वाढवणारी ठरेल, असे भाजप सरकारचे म्हणणे आहे.
ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यांची सुरुवात नवी दिल्लीतील गालिब अकादमीतून झाली आहे.